मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप ते अजित पवार दौरा; उदय सामंत म्हणतात, “गुड न्यूज मिळेल…”
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तासभर चर्चा केली. अजित पवार यांच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटेल अशी आशा सर्वांना आहे. अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.
नागपूर : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात हाचालींना वेग आला आहे. गेले दोन दिवस मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत बैठाका पार पडल्या. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तासभर चर्चा केली. अजित पवार यांच्या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटेल अशी आशा सर्वांना आहे. अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, “खातेवाटप लवकर झाले तर काही प्रश्न शिल्लक राहणार नाही. अपेक्षा करू लवकरच हा प्रश्न निकाली निघेल. अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यातून काही चांगलं समोर येईल.”
Published on: Jul 13, 2023 09:08 AM
Latest Videos