पहाटेच्या शपथविधीवर ‘हे’ दोन नेते अधिकारवाणीने बोलू शकतात; उदय सामंत यांचं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना पहाटेच्या शपथविधीविषयी मोठे गौप्यस्फोट केलेत. शिंदेगटाचे नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहा काय म्हणालेत...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमात बोलताना पहाटेच्या शपथविधीविषयी मोठे गौप्यस्फोट केलेत. त्यानंतर फडणवीस यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत. शिंदेगटाचे नेते उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार हेच दोघं पहाटेच्या शपथविधीविषयी सांगू शकतात. शपथविधीच्या दिवशी नेमकं काय झालं हे तेच दोघं सांगू शकतात, असं उदय सामंत म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती आहे म्हणूनच ते याविषयी बोलत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला सकाळच्या शपथविधीचा प्रश्न पडला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काल संपूर्ण महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे.त्यांनी वास्तव सांगितलं आहे, असंही सामंत म्हणालेत.
Published on: Feb 14, 2023 01:47 PM
Latest Videos