कोल्हापूर राड्याच्या आरोपांवर उदय सामंत म्हणतात, “विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला”
कोल्हापुरात झालेल्या राड्यावरून विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून दंगली होत असल्याचा आरोप केला आहे.या आरोपांवरून शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका केली आहे
मुंबई : कोल्हापुरात झालेल्या राड्यावरून विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून दंगली होत असल्याचा आरोप केला आहे.या आरोपांवरून शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “शिंदे-फडणवीस सरकार हे यशस्वी ठरले, म्हणून विरोधक असे आरोप करत आहेत. एका मुस्लिम समाजाचा मुलगा शिवसेनेची धुरा हातामध्ये घेऊन काम करायला लागतो, त्यामुळे या सर्वांचा शिंदे सरकारवर विश्वास आहे. सामान्य शिवसैनिक शिंदेंच्या बाजूने उभा राहतोय याच विरोधकांच्या पोटात पोटसुळ उठलंय.विरोधकांचा डाव आम्ही उधळून लावलेला आहे”, असं उदय सामंत म्हणाले. “आमचा शाखाप्रमुख बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय, त्यामुळे कुठेही दंगल घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत नाहीत. आमच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम, विभाजन करण्याचं काम हा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत.त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन विकासाची काम केलेली आहेत.इथला अल्पसंख्याक समाज देखील आमच्या सोबत येत आहे त्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये दुखू लागलेला आहे”, असं उदय सामंत म्हणाले.