Uday Samant LIVE | राणेंच्या अॅसिड हल्ल्याच्या आरोपांवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. आता शिवसेनेकडून यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. उदय सामंत यांनी राणेंच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला ललकारले आहे. भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे, जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणं माहीत आहेत. सर्व जुनीप्रकरणं टप्याटप्याने बाहेर काढणार, आवाज खणखणीत झाला की खणखणीत वाजवणार, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
ज्यानंतर शिवसेनेकडून सर्वात पहिली प्रतिक्रिया यावर आली आहे. उदय सामंत यांनी राणेंच्या वक्तव्याबाबत बोलताना कोणीही वैयक्तिक टीका करणं बरोबरं नाही. तसंच उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चूकीचं विधान कोणताच शिवसैनिक सहन करणार नाही. आमच्यासाठी उद्धल ठाकरे दैवत आहेत. असंही सामंत म्हणाले आहेत.