Uday Samant: राजकारण हे आरोग्यदायी असले पाहिजे असे उद्धव ठाकरेच म्हणायचे- उदय सामंत

| Updated on: Aug 07, 2022 | 1:09 PM

अधिकार दिले याचा अर्थ मंत्र्यांच्या सह्यांचा अधिकार दिला असे अजिबात नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या टीकेवर भाष्य करीत असताना राजकारण हे आरोग्यदायी असले पाहिजे असे उद्धव ठाकरेच म्हणायचे अशी आठवण सामंत यांनी करून दिली.

संबंधित खात्याच्या सचिवांना विशेष अधिकार दिल्यामुळे विरोधी पक्षाकडून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत असताना आमदार उदय सामंत यांनी पक्षाची भूमिका स्पस्ट केली. सरकारी कामं खोळंबून जनतेला त्रास होऊ नये यासाठी सचिवांना विशेष अधिकार देण्यात आल्याचे उदय सामंत म्हणाले. अधिकार दिले याचा अर्थ मंत्र्यांच्या सह्यांचा अधिकार दिला असे अजिबात नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या टीकेवर भाष्य करीत असताना राजकारण हे आरोग्यदायी असले पाहिजे असे उद्धव ठाकरेच म्हणायचे अशी आठवण सामंत यांनी करून दिली. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बोलताना सामंत म्हणाले की, येत्या दोन ते तीन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

Published on: Aug 07, 2022 01:09 PM