पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन…, पंकजा मुंडेंच्या सभेत उदयनराजे भावूक
बीडमधील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले भावूक. म्हणाले पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणेन.
भाजप नेते उदयनराजे भोसले हे आज बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. भाजपकडून बीडमध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार संपणार आहे. यावेळी उदयनराजे भोसले बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेत बोलताना भावूक झाल्याचं दिसलं. त्याचसोबत पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर झाले. पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देईन आणि साताऱ्यामधून त्यांना निवडून आणेन असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं.
Published on: May 11, 2024 04:47 PM
Latest Videos