“पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, ते वचन अमित शाह यांनी…”, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
यवतमाळ : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन मी जाहीरपणे आधीच सांगितलं आहे. अमित शाह आणि माझ्यात बंद दाराआड काय घडलं ते सांगितलं आहे. आज मी पोहरादेवीला आलोय. इथेही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो आमच्यात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचं ठरलं होतं. ते वचन शाह यांनी पाळलं असतं तर आज कदाचित भाजप किंवा शिवसेनाच मुख्यमंत्री होऊन गेला असता. आज भाजपला इतर पक्षातून आलेल्यांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या. तसेच भाजपच्या जुन्या, निष्ठावंत आणि मेहनती कार्यकर्त्याांना बाहेरून आलेल्यांची सरबराई करावी लागली नसती.”
Published on: Jul 09, 2023 03:47 PM
Latest Videos