“आपल्या सगळ्यांचे गुरु एकच, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे”, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
काल राज्यभरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मातोश्रीवर गुरुपौर्णिमा साजरी केली. गुरुपौर्णिमेनिमित्त उद्धव ठाकरे यांना वंदन करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते काल मातोश्रीवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सगळ्यांचे गुरु एकच आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : काल राज्यभरात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मातोश्रीवर गुरुपौर्णिमा साजरी केली. गुरुपौर्णिमेनिमित्त उद्धव ठाकरे यांना वंदन करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते काल मातोश्रीवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या सगळ्यांचे गुरु एकच आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं वक्तव्य केलं आहे. राज्यात घडलेली राजकीय घडामोड ताजी असतानाच उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपण सगळे मिळून माननीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होत आहोत कारण आपल्या सगळ्यांचे गुरु एक आहेत. मी सुद्धा तुमच्यातलाच आहे, त्यामुळे मला गुरु मानू नका. पाया पडायचं ते बाळासाहेब ठाकरेंच्या समोर. आपला जो परिवार आहे तो मजबूत ठेवा,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.