Special Report : ठाकरे-फडणवीस यांची लढाई कुटुंबीयांपर्यंत, नेमकं प्रकरण काय?
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पाटण्यातील बैठकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. विरोधक परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. यालाच प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना आव्हान दिलं आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पाटण्यातील बैठकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. विरोधक परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. यालाच प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. “देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे यांचं आव्हान स्वीकारत जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शाब्दिक युद्ध आता कुठपर्यंत जात यासाठी पाहा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…