बंगळुरूत उद्धव ठाकरे यांचा एल्गार; म्हणाले, हा कुटुंब वाचवण्याचा लढा, देश हेच आमचं कुटुंब !
देशातील 26 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. बंगळुरू येथे पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीत 26 पक्षांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असं नाव दिलं आहे. यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, "विरोधी पक्षांची दुसरी यशस्वी बैठक झाली.
बंगळुरू, 19 जून 2023 | देशातील 26 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. बंगळुरू येथे पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीत 26 पक्षांनी त्यांच्या आघाडीला इंडिया असं नाव दिलं आहे. यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, “विरोधी पक्षांची दुसरी यशस्वी बैठक झाली. हुकुमशाहीच्या विरोधात जनता एकत्र येत आहे. इंडिया असं नाव या एकत्रिकरणाला दिलं गेलं. ज्या देशासाठी आपण लढत आहेत. त्या नावाला घेऊनचं आपण समोर जाणार आहोत. यासाठीच आपण एकत्र आलो आहोत. ही लढाई फक्त आपल्या पक्षाची नाही. देश हा आमचं कुटुंब आहे. या देशाच्या कुटुंबासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. या कुटुंबाला आपल्याला वाचवायचं आहे. लोकांना विश्वास देतोय की, तुम्ही घाबरू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही आहोत. तु्म्ही चिंता करू नका.पुढची बैठक आपण महाराष्ट्रात करू.”