बावनकुळे…. मतिमंद माणूस…; चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याचा पलटवार
उद्धव ठाकरे यांचं बोलणं अशा पद्धतीचं राहिलं तर, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे जिथे जातील, तिथे भाजपा रस्त्यावर उतरेल. राज्याचा अध्यक्ष म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आज तुम्हाला शेवटची संधी दिली. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा असा दम दिला.
अकोला : ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली. दरम्यान, या आक्षेपार्ह टीकेवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांचं बोलणं अशा पद्धतीचं राहिलं तर, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे जिथे जातील, तिथे भाजपा रस्त्यावर उतरेल. राज्याचा अध्यक्ष म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आज तुम्हाला शेवटची संधी दिली. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा असा दम दिला. त्यावक्तव्यावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी, ओरिजनल दूध न पिलेला माणूस म्हणजे बावनकुळे, मतिमंद माणूस अशी टीका केली आहे. तर त्यांच्याकडे पाहिलं तर तो एक मतिमंद माणूस दिसत असल्याचं वक्तव्य देशमुख यांनी केल आहे.