Special Report | विदर्भातून उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली, शिंदे-भाजपवर हल्लाबोल करत रणशिंग फुंकलं!
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीची सुरुवात केली आहे. यासाठी ते दोन दिवसांचा विदर्भ दौरा होते. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीची सुरुवात केली आहे. यासाठी ते दोन दिवसांचा विदर्भ दौरा होते. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मर्दाची औलाद असला तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवून लढा, भाजप म्हणजे मुंह में राम बगल में छुरी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. विरोधी पक्षांना फोडण्यावरून उद्धव ठाकरे हे भाजपवर चांगलेच बरसले. “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असं रामदास स्वामी म्हणायचे. पण भाजपचं वेगळंच आहे. भ्रष्ट तितुका मेळावावा, भाजप पक्ष वाढवावा, असं भाजपचं सुरू आहे. त्रिशूळाची 3 टोक टोचतील ते माहितही पडणार नाही, असं ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय काय आरोप केले, यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
Published on: Jul 11, 2023 12:39 PM
Latest Videos