Uddhav Thackeray Sabha BKC | बडवत बसा घंटा; ठाकरेंचा टोला
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तुमच्याप्रमाणे मलाही आज मोकळं वाटतंय. बऱ्याच दिवसानंतर मैदानात उतरलो आहे. मोकळा श्वास घेत आहे. अनेक विषयावर बोलायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यावर आणखी काही बोलण्याची गरज नाही.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील बीकेसी मैदानावरुन भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तुमच्याप्रमाणे मलाही आज मोकळं वाटतंय. बऱ्याच दिवसानंतर मैदानात उतरलो आहे. मोकळा श्वास घेत आहे. अनेक विषयावर बोलायचं आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यावर आणखी काही बोलण्याची गरज नाही. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय हे महाराष्ट्रात राहून कळलं नाही. त्यांच्यासाठी मध्येमध्ये बोलावं लागतं. विषय बरेच आहेत. त्यातही खोटा हिंदुत्वाचा बुरखा घेतलेला पक्ष सोबत होता. तो देशाची दिशा भरकटवत आहे. तुम्ही मला गदा दिली. मध्ये बोललो होतो आमचं हिंदुत्व कसं आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आपलं हिंदुत्व गदाधारी तर इतरांची घंटा धारी. बसवा हलवत घंटा.