Rohit Pawar on lathi charge : ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले त्यांनी पदावरून रिक्त व्हावे, आमदार रोहित पवार यांनी सांगितला तो प्रसंग
चर्चा करू शकले असते. चर्चा न करता पोलीस पाठवता. दगडफेक आधी झाली नव्हती. मुलांवर, महिलांवर लाठीचार्ज केलं गेलं. महिलांचे डोळे गेले आहेत. रबरच्या गोळ्या वापरले. छातीमध्ये छर्रे गेले आहेत. डोळे गेले आहेत.
जळगाव, २ सप्टेंबर २०२३ : रास्ता रोको आंदोलनात आमदार रोहित पवार सहभागी झाले. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, विविध संघटनांचे कार्यकर्ते आले आहेत. चर्चेतून मार्ग काढता आला असता. चर्चेला महत्त्व दिलं जातं. माणूसकीला महत्त्व दिलं जाते. जालन्यातील घटनेत सरळ काठी उगारली. मुलांना, महिलांना मारहाण करण्यात आले. आदेश कधी अधिकारी देत नसतो. गृहमंत्र्यांकडून आदेश यावा लागतो. लाठीचार्ज झाला याचा अर्थ गृहमंत्री जबाबदार आहेत. ज्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला त्यांनी पदावरून रिक्त झालं पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. ते म्हणाले, डॉक्टरांनासुद्धा सोडलं नाही. चर्चा करू शकले असते. चर्चा न करता पोलीस पाठवता. दगडफेक आधी झाली नव्हती. मुलांवर, महिलांवर लाठीचार्ज केलं गेलं. छर्रे वापरले गेले. महिलांचे डोळे गेले आहेत. रबरच्या गोळ्या वापरले. छातीमध्ये छर्रे गेले आहेत. डोळे गेले आहेत. लाठीचार्ज केल्यानंतर युवक कसे शांत बसतील. युवकांनी आधी दगडफेक केली नाही. आधी लाठीचार्ज झाला. त्यानंतर काही जणांनी दडगफेक केली असेल. लाठीचार्ज करण्यासाठी आदेश कुणी दिला. गृहमंत्र्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला असेल, तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.