‘तो’ माणूस नालायक, त्याला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

| Updated on: Nov 28, 2023 | 5:34 PM

जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाहीने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करण्यासाठी नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : एकीकडे राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात गेल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाहीने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करण्यासाठी नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर आपल्या राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. त्यासाठी काय केलं असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. इथं राज्यात गाई-वासरे मरुन पडत आहेत. हे दुसऱ्या राज्यात जाऊन प्रचार करत आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात. हे सरकारचं तेरावा महिना आहे. राज्य संकटात असताना जो माणूस दुसऱ्या राज्यात प्रचाराला जातो असा माणूस राज्याचा कारभार करायाला नालायक आहे, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Published on: Nov 28, 2023 05:34 PM