ठाकरेंसाठी सगळ्यात मोठा धक्का, सुचवलेली चिन्ह नाकारली जाण्याची शक्यता
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलं आहे. चिन्हावरून पुन्हा एकदा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागलं आहे. कारण ठाकरे आणि शिंदे गटाने (Eknath Shinde) आपली चिन्ह आणि पक्षाची नावं निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहेत. ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हे मिळावीत म्हणून प्रस्ताव देण्यात आला आहे. पण ती ठाकरेंना (Uddhav Thackeray) मिळण्याची शक्यता कमी आहे.उगवता सूर्य आणि त्रिशूल दोन्ही चिन्ह नाकारली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. कारण ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटाकडून उगवता सूर्य आणि त्रिशूल या दोन्ही चिन्हांवर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही दोन्ही गोठवलं जाण्याची शक्यता आहे.
Published on: Oct 10, 2022 12:58 PM
Latest Videos