जेव्हा वैभव नाईक यांच्याकडून भरत गोगावले यांची वाट आडवली जाते; काय झालं असं की गोगावले देखील….
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटाची यात एन्ट्री झाली. त्यानंतर खाते वाटप झालं. तर तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला स्थान देण्याचे सुरू असतानाच तिसरा विस्तार रखडला.
मुंबई, 20 जुलै 2023 | भाजप-शिंदे गटाचा रखडेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. मात्र यावरून शिंदे गटात कमालिची नाराजी पसरली आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटाची यात एन्ट्री झाली. त्यानंतर खाते वाटप झालं. तर तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला स्थान देण्याचे सुरू असतानाच तिसरा विस्तार रखडला. त्यावेळी शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता काय फरक पडत नाही, तर पालकमंत्री नाही झालो तरी आम्ही तटकरे यांच्यापेक्षा अधिक आणि चांगले काम करू असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरून राज्याच्या राजकारात जोरदार चर्चा झाली होती. मात्र आता यावरून उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी गोगावल्यांची वाट अडवल्यावरून देखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यावेळी वैभव नाईक यांनी गोगावल्यांची भावी पालकमंत्री म्हणून उल्लेख केला. तर इर्शाळगडवाडी दुर्घटने बाबत आपण काय आढावा घेतला असा प्रश्न केला आहे. यावरून सध्या विधामंडळ परिसरात चर्चा रंगली आहे.