केंद्रीय अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे म्हणाले; अबरा का डाबरा, कबुतर उडून गेलं अन् टोपी….
आर्थिक वर्ष २०२४ -२०२५ या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला. याच अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. अर्थसंकल्पाची तुलना उद्धव ठाकरे यांनी जादूच्या प्रयोगाशी करत सडकून टीका केली
रायगड, १ फेब्रुवारी २०२४ : आर्थिक वर्ष २०२४ -२०२५ या वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केला. याच अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्राच्या अर्थसंकल्पाची तुलना उद्धव ठाकरे यांनी जादूच्या प्रयोगाशी करत सडकून टीका केली. जादूमध्ये कबूतर उडून जातं. हाती काही उरत नाही, त्याप्रकरचा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जादूगार यायचा रिकामी टोपी दाखवायचा. मंत्र म्हणायचा. झोळीत हात घालायचा आणि कबुतर काढायचा. तेव्हा आश्चर्य वाटायचं. रिकाम्या टोपीतून कबुतर काढलं आपलं मत यालाच, असं आपण म्हणायचो. पण लक्षात आलं नाही की, कबुतर उडून गेलं, टोपी आपल्याला घातली. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याचे म्हणत खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Published on: Feb 01, 2024 02:45 PM