उद्धव ठाकरे यांनी दिला भाजपला मोठा धक्का, 'हा' मोठा नेता उद्या करणार पक्षप्रवेश

उद्धव ठाकरे यांनी दिला भाजपला मोठा धक्का, ‘हा’ मोठा नेता उद्या करणार पक्षप्रवेश

| Updated on: Jan 26, 2023 | 11:15 AM

डॉ.अद्वय हिरे हे माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांचे पुत्र आहेत. डॉ.अद्वय हिरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली.

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde ) आणि भाजपमध्ये ( bjp ) प्रवेश करत आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे.

नाशिक आणि मालेगाव येथील भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ. अद्वय हिरे हे उद्या शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. डॉ.अद्वय हिरे हे माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांचे पुत्र आहेत. डॉ.अद्वय हिरे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली. उपस्थित कार्यकर्त्यांनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून उद्या डॉ.अद्वय हिरे यांच्यासोबत नाशिक, मालेगाव येथील समर्थकही पक्षप्रवेश करणार आहेत.

Published on: Jan 26, 2023 11:15 AM