आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर नारायण राणेंची आगपाखड; म्हणाले, आता…
राणे यांनी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आहे आदित्य ठाकरे? त्याला काय प्रतिष्ठा आहे? बालिश आहे तो. तुम्ही आता शाळेतल्या मुलांवरही प्रश्न विचारणार का? एकनाथ शिंदे भाजपाबरोबर गेले नाही. ते शिवसेना पक्ष घेऊन आले आहेत.
मुंबई : उद्धव टाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून गौप्यस्फोट करत शिंदे मातोश्रीवर रडल्याचे बोलले. त्यांच्या या दाव्यावरून आता राजकारण चांगलच गरम होताना दिसत आहे. याबरोबरच चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा हेच कारण होत असेही ते म्हणाले होते. त्यावरून भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे तोंड सुख घेत टीका केली आहे.
राणे यांनी, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, मी अजिबात उत्तर देणार नाही. कोण आहे आदित्य ठाकरे? त्याला काय प्रतिष्ठा आहे? बालिश आहे तो. तुम्ही आता शाळेतल्या मुलांवरही प्रश्न विचारणार का? एकनाथ शिंदे भाजपाबरोबर गेले नाही. ते शिवसेना पक्ष घेऊन आले आहेत. शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी ही युती आहे. अशा प्रश्नांची तुम्ही का दखल घेताय मला कळत नाही. मी त्यांच्या मुद्द्यावर उत्तर देणार नाही. काहीही बोलतात ते. म्हणे रडले होते. कोणत्या वर्षी रडले होते?, असा सवाल राणे यांनी यावेळी केला आहे.