आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर केसरकरांचा टोला; म्हणाले, लावा ठाकरेंची ती कँसेट

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर केसरकरांचा टोला; म्हणाले, लावा ठाकरेंची ती कँसेट

| Updated on: Apr 13, 2023 | 2:43 PM

आदित्य ठाकरे यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिली जात आहे. त्यासाठी एक एजन्सी नेमलेली असल्याचे ते बोलले. त्याचबरोबर कोण खोट बोलतयं हे पाहण्यासाठी तुम्ही उद्धव ठाकरें यांची मुलाखत लावा

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवरून गौप्यस्फोट करत शिंदे मातोश्रीवर रडल्याचे बोलले. त्यांच्या या दाव्यावरून शिंदे गटातील नेत्यांसह भाजपही आक्रमक झाली. यावरूनच शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच आदित्य ठाकरे यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिली जात आहे. त्यासाठी एक एजन्सी नेमलेली असल्याचे ते बोलले. त्याचबरोबर कोण खोट बोलतयं हे पाहण्यासाठी तुम्ही उद्धव ठाकरें यांची मुलाखत लावा. ज्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावल्याचं आणि मुख्यमंत्री पाहिजे तर व्हा मी मुख्यमंत्री पद सोडतो असे आवाहन केलं होतं. तर त्यांच्याच डोळ्यात त्यावेळी पाणी होतं हे पाहता येईत. त्यामुळे आदित्य यांच्या या वक्तव्यावरून खोटं कसं बोलावं याचं उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्रामध्ये नवीन तयार होतय. एक नवीन गोबेल्स महाराष्ट्रामध्ये तयार होतं आणि ही महाराष्ट्राची परंपरा अजिबात नाही असेही केसरकर म्हणाले.

Published on: Apr 13, 2023 02:43 PM