सामनाच्या अग्रलेखावरून शिवसेना मंत्र्याचा पलटवार, म्हणाला; राऊत यांनी लिहतं राहावं, पण…”
मानवी आरोग्यासाठी धोकादायक विषाणू जसे आहेत तसे मानवी जीवन सुरळीत आणि सुरक्षित करणारी शासन व्यवस्था, राज्यघटना, धार्मिक व सामाजिक सलोखा, लोकशाही धोक्यात आणणारेदेखील आहेत.
रत्नागिरी : उद्धव ठाकरे गटाचं मुख्यपत्र असणाऱ्या दैनिक सामनामधून सरकारवर टीका करण्यात आली आहे. विषाणूचं राज्य म्हणत टीका करण्यात आली आहे. तसेच मागील दीड-दोन दशकांपासून विविध विषाणूंच्या तडाख्यात जग सापडले आहे. सर्वत्रच विषाणूंचे राज्य दिसत आहे. मानवी आरोग्यासाठी धोकादायक विषाणू जसे आहेत तसे मानवी जीवन सुरळीत आणि सुरक्षित करणारी शासन व्यवस्था, राज्यघटना, धार्मिक व सामाजिक सलोखा, लोकशाही धोक्यात आणणारेदेखील आहेत. मानवी आरोग्यासाठी घातक विषाणूंसाठी प्रतिबंधक लसीची मात्रा प्रभावी ठरते तर लोकशाहीसाठी धोकादायक ठरणाऱ्या विषाणूंवर जनतेची ‘मात्रा’ परिणामकारक ठरते, असं म्हणण्यात आलं आहे. त्यावरून शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी सामनावरून खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत यांना सतत चर्चेत राहण्याची सवय आहे. त्यांच्याकडे आता काहीही कामं राहिलेली नाहीत, असं उदय सामंत यांना म्हटलं आहे. तर सामनातील अग्रलेखाचा काय परिणाम होतो हे आत्ता झालेल्या निवडणुकीवर समोर आलं आहे. त्यामुळं राऊत यांनी सामनात लिहत राहवं.