विनायक राऊतांची राज ठाकरेंना म्हणाले, सुपारी घेऊन बोलायचे…
राज ठाकरे यांच्या उद्योग बाहेर जाण्याने काही फरक असे म्हटलं होतं. त्यावर राऊत यांनी पलटवार करताना, राज्यातले प्रकल्प राज्याबाहेर नेले आणि महाराष्ट्राला कंगाल केलं. मात्र...
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना एकदोन उद्योग बाहेर गेल्याने फरक पडत नाही, असे विधान केले होते. यावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्यावर जहरी टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या उद्योग बाहेर जाण्याने काही फरक असे म्हटलं होतं. त्यावर राऊत यांनी पलटवार करताना, राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरू केलेत. राज्यातले प्रकल्प राज्याबाहेर नेले आणि महाराष्ट्राला कंगाल केलं. मात्र त्यावर ते काही बोलणार नाहीत अशी टीका केली आहे.
राज्यातले प्रकल्प बाहेर नेले जातात यावर मात्र बोलायला वेळ नाही हे मनसेचे दुर्दैव असल्याचे देखिल राऊत यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरू केलेत. महाराष्ट्रातील दोन नाही तर पाच मोठे उद्योग गुजरातमध्ये गेलेत. त्या उद्योगांच्या जीवावर भाजपने गुजरातची निवडणूक जिंकली असेही राऊत म्हणाले.