VIDEO | ‘शिंदे यांचे मुख्यमंत्री पद जायची वेळ आलीय’; ठाकरे गटाच्या आमदाराचं मोठं वक्तव्य; पवार यांच्यावर देखील जहरी टीका
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात होणाऱ्या भेटींमुळे सध्या मविआत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. तर यामागे शरद पवार हेच असल्याचे देखील बोलले जात आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्याने देखील टीका केली आहे
सिंधुदुर्ग : 19 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी विरोध दर्शविला आहे. याच दरम्यान अजित पवार यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याने आगीत तेल ओतण्याचा प्रकार झाला आहे. त्यावरून शरद पवार यांनाच मविआतून वळण्याच्या चर्चा उठल्या होत्या. पण आता त्या चर्चा शांत झाल्या आहेत. मात्र याचदरम्यान ठाकरे गटाच्या एका आमदारानं थेट शरद पवार यांच्यावरच निशाना साधला आहे. ज्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, उद्धव ठाकरे हे पवार नाहीत की ते ‘तोंडात एक आणि ओठावर एक’ अशा शब्दात पवारांच्या भुमिकेवर निशाणा साधला आहे. तसेच शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पद जायची वेळ आता आली आहे. आणि शिंदे सोबतचेच आमदार ठाकरेंकडे यायला इच्छुक आहेत. जे आमदार मंत्री पदाच्या आशेने शिंदे सोबत गेले त्यांना काही मंत्रीपद मिळाले नाही उलट लोकांचा रोष त्यांच्यावर आहे. त्यामुळे ते आमदार पुन्हा ठाकरेंकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा आमदारांना उद्धव ठाकरे पुन्हा शिवसेनेत घेणार नाहीत असे त्यांनी म्हटलं आहे.