माफी मागा अन्यथा…; रिक्षा चालकांचा अरविंद सावंत यांना इशारा
शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षावाल्यांनी दहिसर कांदरपाडा येथे आंदोलन केले
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करत त्यांना रिक्षावाला मुख्यमंत्री म्हटलं होतं. त्यावरून आता मुंबईतील रिक्षावाले चांगलेच आक्रमक झाले आहे. सावंत यांच्या या वक्तव्याचा मुलुंड स्थानक बाहेर रिक्षा चालक-मालक आणि शिवसेना पदाधिकारी यांना आंदोलन करत समाचार घेतला. तर निषेध व्यक्त करताना त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले. असेच आंदोलन दहिसर कांदर पाडा येथेही करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षावाल्यांनी दहिसर कांदरपाडा येथे आंदोलन केले. यावेळी खासदार सावंत यांच्या प्रतिमेस आंदोलकांनी जोडे मारून जोरदार आंदोलन केले. यावेळी शेकडा रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते. तर जोपर्यंत खासदार सावंत हे रिक्षा चालकांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी आमदार सुर्वे यांनी दिला.