खातेवाटात शिंदे गटाचा दबाव? राऊत म्हणतात, ‘शिंदे गटच वैफल्यग्रस्त’
यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर देखील तोफ डागताना त्यांनी शब्द पाळला नाही. जे उद्धव ठाकरे बोलले ते सत्य आहे असा घणाघात भाजपवर केला. याचवेळी त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला.
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर आज पत्रकार परिषदेतून निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यावर देखील तोफ डागताना त्यांनी शब्द पाळला नाही. जे उद्धव ठाकरे बोलले ते सत्य आहे असा घणाघात भाजपवर केला. याचवेळी त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला. तर 10 दिवस झाले तरी अजुनही सरकारच्या या नव्या मंत्र्यांना खातेवाटप झाले नाही. फक्त त्यांनी बिनखात्याचे मंत्री केल्याची टीका केली. यावेळी यामागे शिंदे गटाचा दबाव होता असे वाटतं का असा सवाल त्यांना करण्यात आला. यावरून त्यांनी शिंदे गटाबाबत काय म्हटलं आहे पहा…
Published on: Jul 10, 2023 03:34 PM
Latest Videos