संजय राऊतांनी याची माहिती आधीच दिली होती, पण…; अंबादास दानवेंचा सरकारवर हल्ला
खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीवरून उद्धव ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला करत टीका केली आहे
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याची माहिती संजय राऊतांनी दिली असून पोलिसांनी त्यासंदर्भात तपास सुरू केला आहे. तर काही जनांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. आता त्याच्या सुरक्षतेत वाढ देखील करण्यात आली आहे. मात्र यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला करत टीका केली आहे. त्यांनी संजय राऊत हे सरकारला विरोध करत असल्याने त्यांच्या माहितीकडे शिंदे-फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. दानवे यांनी, संजय राऊत यांनी त्यांना धमक्या येत आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्याबाबत कल्पना गृह खात्याला दिली होती. मात्र सरकारनं त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल. त्यांना अशा पद्धतीने धमक्या येत असतील तर त्याची दखल सरकारनं घ्यावी. तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.