त्यांना अडीत वर्षात असा कार्यक्रम करता न आल्याने या टीका, राऊत यांच्या टीकेला शिवसेना नेत्याचं प्रत्युत्तर
आम्ही लोकांसाठी पाण्यासह ओआरएस आणि इतर सर्व सुविधा ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे प्रथोमपचार करण्यात आले. त्यातही दुर्दैवाने काही लोकांना जीव गमवावा लागला याचे दुख: आहे. पण आम्ही मान्यवरांसाठी एक आणि लोकांसाठी एक असा भेदभाव करत नाही
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. तसेच समोर बसलेल्या सहा-सात लाख लोकांची सोय न पाहता, व्यासपीठावरील अप्पासाहेब वगळता इतर राजकीय नेत्यांची सोय पाहिली गेल्याचे म्हटलं होतं. त्यावर आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी, आम्ही लोकांसाठी पाण्यासह ओआरएस आणि इतर सर्व सुविधा ठेवल्या होत्या. त्याप्रमाणे प्रथोमपचार करण्यात आले. त्यातही दुर्दैवाने काही लोकांना जीव गमवावा लागला याचे दुख: आहे. पण आम्ही मान्यवरांसाठी एक आणि लोकांसाठी एक असा भेदभाव करत नाही. पण संजय राऊत यांना कसलाही कार्यक्रम असला टीका करावी वाटते. हा तर अध्यात्म क्षेत्रातला कार्यक्रम होता. नॉन पॉलिटिकल कार्यक्रम होता. एवढा मोठा कार्यक्रम त्यांना अडीच वर्षात घेता आला नाही. याची सल, खंत ज्यांच्या मनात आहे. म्हणून ते अशी टीका करत आहेत.