‘लिहून घ्या सोमवार आहे. शंकराचा वार आहे’, शिवसेना नेत्यानं असं म्हणत कोणावर केला पलटवार?
भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राऊत सर्वात मोठा जादूटोना करणारा तुझा मालक आहे अशी टीका केली होती.
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदे-फडणवीस सरकार जाणार ते पडणार याच्या शेवटच्या घटका मोजतय असे म्हणत असतात. तर भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राऊत सर्वात मोठा जादूटोना करणारा तुझा मालक आहे अशी टीका केली होती. त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी टीका केली आहे. त्यांनी राऊत हे सरकार आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल परवा, ठरवा जाईल हेच म्हणत असतात. पण त्यांची भविष्यवाणी खोटी ठरली. तर महाविकास आघाडीत बिघाडी ही होणारच. या तिन्ही पक्षात पटूच शकत नाही. त्यामुळे आज सांगतो लिहून घ्या सोमवार आहे शंकराचा वार आहे, राऊत भविष्यवाणी सांगतोय की आम्ही बोलतोय ते खरं ठरतंय ते पहा….