शहाजीबापू पाटलांची खरमरीत टीका; म्हणाले, संजय राऊत ऊर्फ...

शहाजीबापू पाटलांची खरमरीत टीका; म्हणाले, संजय राऊत ऊर्फ…

| Updated on: Mar 17, 2023 | 2:28 PM

शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे. संजय राऊत उर्फ संजय आगलावे यांच्या या विधानाचा आपण निषेध करत असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाना साधला होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना, ते मुख्यमंत्री नव्हे तर मक्खमंत्री आहेत असे म्हणाले होते. त्यावर शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे. संजय राऊत उर्फ संजय आगलावे यांच्या या विधानाचा आपण निषेध करत असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची निवड एवढी चुकीची कशी काय असा सवाल ही त्यांनी केला. संजय राऊत हे फक्त टीका करणे, बडबड करणे, टोमणे देणे नाहीतर घाणेरडं लिखाण करणे याशिवाय काही काम करू शकत नाही. त्यांना याशिवाय आयुष्यात काही आलं नाही आणि पुढे ही काही येणार नाही असा घणाघात केला आहे

Published on: Mar 17, 2023 02:23 PM