दंगली वक्तव्यावर केसरकरांचा वार; म्हणाले, राऊत यांच्यावर कारवाई केली पाहिजे

दंगली वक्तव्यावर केसरकरांचा वार; म्हणाले, राऊत यांच्यावर कारवाई केली पाहिजे

| Updated on: Mar 24, 2023 | 3:02 PM

आज जी राऊत टीका करत आहेत. तेच याच्या आधी मुद्दे पाडण्याची भाषा करत होते. दंगली पेटवण्याची भाषा करत होते. कशाला त्यांना इतकं महत्व देता

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक मधून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारसह राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आधी राज्यातलं वातावरण बिघडवायचं, दंगली घडवायच्या आणि निवडणुकांना सामोरे जायचे. ही पडद्यामागून पटकथा लिहिली जातेय असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या आरोपाला मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देताना संजय राऊत कोण आहेत असं म्हटलं आहे.

आज जी राऊत टीका करत आहेत. तेच याच्या आधी मुद्दे पाडण्याची भाषा करत होते. दंगली पेटवण्याची भाषा करत होते. कशाला त्यांना इतकं महत्व देता. भारतामध्ये कोणी त्यांना सिरीयसली घेत नाही. त्यांनी आपल्या भाषेला मर्यादा घातल्या पाहिजेत. शेवटी दंगलीची भाषा बोलणं हे सुद्धा चुकीचं. ज्याच्यामुळे दंगली भडकवू शकतात. कदाचित त्यांना दंगली भडकवायच्या असतील. त्यामुळे शासनाने याची चौकशी केली पाहिजे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे

Published on: Mar 24, 2023 03:02 PM