‘त्याला’ रेड्याचं दुध काढायचं माहित आहे; राऊतांवर शिवसेना नेत्याकडून पलटवार
आपल्याला अजूनही संरक्षण मिळालेलं नाही. सरकारकडून अपेक्षा नाही. रेड्याकडून दुधाची अपेक्षा काय करणार? अशी टीका राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेला आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर देत राऊतांवर टीका केली आहे
छत्रपती संभाजीनगर : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी हल्ला करत टीका केली होती. त्यावेळी राऊत यांनी देखिल सरकारवर निशाना साधला होता. आजही त्यांनी सरकारवर टीका केली. त्याचबरोबर आपल्याला अजूनही संरक्षण मिळालेलं नाही. सरकारकडून अपेक्षा नाही. रेड्याकडून दुधाची अपेक्षा काय करणार? अशी टीका राऊत यांनी केली. त्यांच्या या टीकेला आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर देत राऊतांवर टीका केली आहे. शिरसाट यांनी, त्याला फक्त रेड्याचं दुध काढायचं माहित आहे. त्याला गाई, म्हशी काही माहिती. काल राऊत यांच्या स्टंटबाजीनंतर काय झालं. त्यानं उद्धव ठाकरे यांना जागा दाखवली. ठाकरेंना गल्लीत आणण्याची किमया फक्त राऊत करू शकतो. संजय राऊतला काही देणं घेणं नाही. त्याला फक्त हायलाईट व्हायचं आहे. उद्या उठवून शरद पवारच्या मांडीवर बसायचंय असही शिरसाट म्हणाले.