उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात राऊतांची छाप; शिंदे गटाच्या मंत्र्याची टीका

उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात राऊतांची छाप; शिंदे गटाच्या मंत्र्याची टीका

| Updated on: Mar 21, 2023 | 8:00 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देणारे आहेत हाच संदेश त्यांनी खरा करून दाखवला. त्यांनी संपकऱ्यांना दिलं

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दादा भूसे यांच्यावर आरोप करत आपण लवकरच स्पोट करू असे विधान केलं होतं. त्यावर शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी सडकून टीका केली. पण सध्या अत्यंत सयमी असणारे उद्धव ठाकरे संगतीमुळे तसेच बोलत असल्याची बोचरी टीका केसरकर यांनी केली आहे.

राज्यात जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. सुमारे 6 दिवस हा संप सुरू होता जो मिटला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देणारे आहेत हाच संदेश त्यांनी खरा करून दाखवला. त्यांनी संपकऱ्यांना दिलं. त्यामुळे महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्र मधले सरकारी कर्मचारी सुद्धा एक पॉझिटिव्ह नेतृत्व त्यांच्याकडे बघतात.

आमच्यावर संपावरून टीका होत होती. मुख्यमंत्री मात्र सभा घेतात असेही बोलले जात होते. पण तसं बिलकुल नव्हतं. अगदी कमी वेळात मिटलेला हा सर्वात मोठा संप आहे. पण सध्या सयमी असे असणारे उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या संगतीमुळे आता त्यांच्यासारखेच बोलत असतात, असा टोला केसरकर यांनी लगावला.

Published on: Mar 21, 2023 07:57 AM