दहा वर्षे अंडी उबवत होतात काय ? उद्धव ठाकरे यांचा भाजपाला सवाल

दहा वर्षे अंडी उबवत होतात काय ? उद्धव ठाकरे यांचा भाजपाला सवाल

| Updated on: Jan 23, 2024 | 2:19 PM

उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाअधिवेशन नाशिक येथे सुरु आहे. या महाअधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले आहे. पंतप्रधान पहिले पाच वर्षे जगभर फिरत होते. परंतू अयोध्येला गेले नव्हते. आता सर्व राम राम करीत आहेत. परंतू काम की बात केव्हा करणार ? दोन कोटी नोकऱ्या देणार होते कुठे गेल्या दोन कोटी नोकऱ्या अशी टीकाही त्यांनी केली आहे.

नाशिक | 23 जानेवारी 2024 : कामगार बेकार होत आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. आणि भाजपाचे नुसते राम राम चालले आहे. अयोध्येचा इव्हेंट झाला आता राम की नाही काम की बात करो असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे महाअधिवेशन नाशिक येथे सुरु आहेत. तेथील भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपपावर कठोर शब्दात टीका केली आहे. भाजपाने पीएम केअर घोटाळ्याचा हिशेब आधी द्यायला हवा, देशभरातील कोरोनाकाळातील खरेदी लेखाजोखा भाजपाने मांडायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पंतप्रधान पाच वर्षे जगभर फिरत होते. तेव्हा अयोध्येत गेले नाही. मणिपूरला गेले नाहीत,आता वृत्तपत्रात बातम्या आल्यात की समर्थ भारत बनविणार म्हणून अरे पण दहा वर्षे काय केले ? अंडी उबविली काय ? असाही सवाल ठाकरे यांनी केला आहे. अमरावती येथे 1100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. दोन कोटी नोकऱ्या देणार म्हणाले कुठे आहेत नोकऱ्या असा सवाल त्यांनी केला.

Published on: Jan 23, 2024 02:18 PM