Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपसह शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांची खरमरीत टीका; म्हणाले, आठवड्याला असाच एक एक नेता फोडा’

भाजपसह शिंदे गटावर उद्धव ठाकरे यांची खरमरीत टीका; म्हणाले, आठवड्याला असाच एक एक नेता फोडा’

| Updated on: Jul 29, 2023 | 3:37 PM

यादरम्यान अजूनही ठाकरे गटातून शिंदे गटात होणारे इनकमिंग थांबलेलं नाही. त्यावरून आज उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला आहे. त्यांनी, जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’

मुंबई, 29 जुलै 2023 | शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर आता एक वर्ष होत आहे. यादरम्यान अजूनही ठाकरे गटातून शिंदे गटात होणारे इनकमिंग थांबलेलं नाही. त्यावरून आज उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला आहे. त्यांनी, जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणताना, मिंदे आणि भाजपने दर आठवड्यात एख माणूस फोडा. बिनकामाचे लोक गेल्यावर शिथिलता आलेले शिवसैनिक जोमाने कामाला लागतील. मिंदे गटाला धन्यावाद देतो. तुम्ही एकचं काम करत राहा ज्यामुळे शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहील. तर जे गेलेत त्यांना त्यांचे सुख लखलाभ तर माझं सुख आपल्यामध्ये असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते सायन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मातोश्री येथे बोलत होते.

Published on: Jul 29, 2023 02:59 PM