मोठी बातमी; इर्शाळवाडी दरड दुर्घटनेवरून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसावरून घेतला मोठा निर्णय
याचदरम्यान माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली होती. तसेच इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देताना, पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असेही आश्वासन दिलं होतं.
मुंबई, 23 जुलै 2023 | रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही येथे मदत आणि बाचवकार्य सुरू आहे. याचदरम्यान माजी मुख्यमंत्री ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनाग्रस्तांची भेट घेतली होती. तसेच इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देताना, पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असेही आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसावरून मोठा निर्णय जाहिर केला आहे. 27 जुलै रोजी ठाकरे यांचा वाढदिवस असतो. त्यासाठी दरवर्षी हजारो शिवसैनिक शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री निवासस्थानी येतात. पण यावेळी इर्शाळवाडी मोठी दुर्घटना झाली. ज्यात 27 जणांचा मृत्यू झाला. यामुळे उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्धार केला आहे.