‘कोर्टाला शेवटची विनंती….नाही तर आता…,’ काय म्हणाले उद्धव ठाकरे
शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचं मागितले की हे लगेच हे अन्याय करणार, मोदी आणि अब्दाली अमित शाह यांचं म्हणणे आम्ही की जे आम्ही देऊ तेच घ्या, हक्काचं मागू नका. हक्काचं मागाल तर आम्ही तुमच्या मागे ईडी, इन्कम टॅक्स सीबीआय लावू, ताट मानेने जगाल तर याद राखां, तुरुंगाच टाकू आमच्या समोर याल तर खाली मान आणि हातात कटोरा घेऊन यायला पाहीजे हे तुम्हाला मंजूर आहे का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात राज्य सरकारची अक्षरश: लक्तरे काढली. ते पुढे म्हणाले की कोर्टाला आता शेवटची विनंती करणार आहे. नाही तर आता नाद सोडतो. लोकशाही टिकविणे ही केवळ शिवसेनेची लढाई नाही.अपात्रतेचा निर्णय…अहो आता संपली ही टर्म संपली उद्या जरी निकाल आमच्या बाजूने लागला तरी ते निवडणूका लढवायला मोकळे आहेत. मग आम्हाला कुठे मिळाला न्याय ? पण आज आम्ही तुमच्याकडे आशेने पहातोय…दिवसा ढवळ्या लोकशाहीचा गळा घोटणारे खुनी, दरोडेखोर जर का आमच्यावर राज्य करीत असतील जर का आम्ही कोर्टाकडून अपेक्षा केल्यानंतर तिथून जर विलंब होत असेल तर आम्ही कोणाकडून अपेक्षा करायची ? मी माझ्या जनतेकडूनच न्यायाची अपेक्षा करणार. कारण जनताच त्याला साक्षीदार आहे. जो गद्दारांनी चोर बाजार मांडलेला आहे आणि आता रेवड्या उडवतायंत…एक तर लुटत आहेत कंत्राटे वाटत आहेत. पैसा ओरबाडतायत. आणि हे कमी पडतेय तर म्हणून आता “लाडकी बहीण” सारख्या योजना आणत आहेत. तुम्ही लाच देऊन मतं विकत घ्यायला बघताय. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांना तुमचे 1500 रुपये मोल देणार का? असेही उद्धव ठाकरे कडाडले.