आवाज कुणाचा; उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? मुलाखतीचा टिझर रिलीज

आवाज कुणाचा; उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार? मुलाखतीचा टिझर रिलीज

| Updated on: Jul 25, 2023 | 10:27 AM

उद्धव ठाकरे यांची एक खास मुलाखत लवकरच प्रसारीत होणार आहे. या मुलाखतीचा प्रोमो ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुंबई, 25 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत 26 आणि 27 जुलै या दोन दिवशी प्रसारित होणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेच ही मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीत उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. त्याचा टिझर रिलिज झाला आहे. आवाज महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखाचा असा उल्लेख या प्रोमोत करण्यात आला आहे.यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून जे म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला त्यावरही भाष्य केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटर पेजवर या मुलाखतीचा पहिला टिझर आला आहे. जो चांगलाच चर्चेत आहे.

Published on: Jul 25, 2023 10:27 AM