विरोधकांना डिपॉझिट जप्त होण्याची भीती; शिवसेना नेत्याचा पटवार

विरोधकांना डिपॉझिट जप्त होण्याची भीती; शिवसेना नेत्याचा पटवार

| Updated on: Apr 16, 2023 | 8:55 AM

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यावेळी त्यांची येथे पाचोर्‍यात भव्य जाहीर सभा होणार असून या सभेत खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत

जळगाव : उद्धव ठाकरे 23 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यावेळी त्यांची येथे पाचोर्‍यात भव्य जाहीर सभा होणार असून या सभेत खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पाचोरा येथे शिवसेना नेते संजय सावंत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सावंत यांनी विरोधकांवर निशाना साधला. त्यांनी विरोधकांच्या मनात ठाकरे नावाचीच भीती असल्याचे म्हटलं आहे.

Published on: Apr 16, 2023 08:55 AM