Special Report | बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा अधिकार नाही; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला खडेबोल
उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका करताना भाजपवरही निशाणा साधला. शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. ठाकरेंच्या आरोपानंतर रामदास कदमांनीही पलटवार केला. शिवसेनेला भाजप नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस संपवत असल्याचं रामदास कदमांनी सांगितलं.
मुंबई : एकनाथ शिंदे आणि भाजपवर उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray ) पुन्हा निशाणा साधलाय. बाळासाहेबांचं नाव आणि बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा अधिकार शिंदे गटाला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा म्हटलंय. उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर शिंदे गटाकडूनही प्रतिक्रिया आलीच. बाळासाहेबांनंतर शिवसेनेत घराणेशाही निर्माण झाल्याचा आरोप शिंदे गटानं केला. उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका करताना भाजपवरही निशाणा साधला. शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. ठाकरेंच्या आरोपानंतर रामदास कदमांनीही पलटवार केला. शिवसेनेला भाजप नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस संपवत असल्याचं रामदास कदमांनी सांगितलं. बाळासाहेबांचा फोटो कुणी वापरायचा? शिवसेनेतल्या नियुक्त्या कुणी करायच्या? शिवसेनेतल्या फुटीला जबाबदार कोण? आणि खरी शिवसेना कुणाची? याचा वाद आता प्रत्येक दिवशी बाहेर येऊ लागलाय.