विश्वकर्मा जयंतीदिनी देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणार

विश्वकर्मा जयंतीदिनी देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणार

| Updated on: Jan 09, 2023 | 11:07 AM

उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत ही या मेळाव्यास उपस्थित होते. त्यांनी यावेळी विश्वकर्मा जयंतीदिनावरून मोठं वक्तव्य केलं आहे

चिपळूण, रत्नागिरी संघाजिल्हा पांचाळ सुतार समाज, उद्धव ठाकरे गट, खासदार विनायक राऊत, संसदेच्या अधिवेशन,
चिपळूण : चिपळूणमध्ये रत्नागिरी संघाजिल्हा पांचाळ सुतार समाज च्या 25 व्या रौप्यमहोत्सवी जिल्हा मेळाव्यास मविआचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत ही या मेळाव्यास उपस्थित होते. त्यांनी यावेळी विश्वकर्मा जयंतीदिनावरून मोठं वक्तव्य करताना, संसदेच्या अधिवेशनात त्यासाठी मागणी करणार असल्याचे म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी पांचाळ सुतार समाज च्या 25 व्या रौप्यमहोत्सवी जिल्हा मेळाव्यास उपसिथिती लावली. यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपावर उत्तर देताना, त्यावर आपण काही बोलणार नाही. पण आमदार कदम हे लवकरात लवकर बरं व्हावेत.

त्याचबरोबर राऊत यांनी विश्वकर्मा जयंतीदिनावरून बोलताना आपण विश्वकर्मा जयंतीदिनी देशात सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यात रामनवमी, शिवजयंतीला सुट्टी असते मग जगाच्या सृष्टीच्या निर्मात्याच्या जयंतीला सुट्टी का देत नाही असा सवाल उपस्थित केला आहे.

Published on: Jan 09, 2023 11:07 AM