मोदींसोबत जवळीक वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा खटाटोप, उबाठा नेत्यानं लगावला खोचक टोला

| Updated on: Nov 30, 2023 | 4:37 PM

येत्या ४ डिसेंबर रोजी नौसेना दिन मालवण आणि सिंधुदुर्ग येथे साजरा केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देखील हजर राहणार

Follow us on

सिंधुदुर्ग, ३० नोव्हेंबर २०२३ : येत्या ४ डिसेंबर रोजी नौसेना दिन मालवण आणि सिंधुदुर्ग येथे साजरा केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देखील हजर राहणार आहे. यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी भाष्य केले आहे. भारतीय नौसेना दिन मालवणमध्ये होतोय याचा आम्हाला अभिमान असल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. तर ४ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात येणाऱ्या पंतप्रधान मोदींसह नौसेना दलातील अधिकाऱ्यांचे स्वागत आहे. मात्र मुख्यमंत्री आज त्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येत आहेत, ते खंरतर मोदींना खूश करण्यासाठी येत आहेत. मोदींच्या जवळ जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे म्हणत खोचक टीका केली आहे.