उध्दव ठाकरे यांच्या सभास्थळी पोहोचण्याच्या मार्गात बदलाची शक्यता; कारण काय?

उध्दव ठाकरे यांच्या सभास्थळी पोहोचण्याच्या मार्गात बदलाची शक्यता; कारण काय?

| Updated on: Mar 26, 2023 | 3:13 PM

Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे यांच्या सभेस्थळी पोहोचण्याच्या मार्गात बदल होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव बदले केले असल्याची माहिती आहे. संजय राऊत, विनायक राऊत यांनी मात्र याच राज मार्गावरून उध्दव ठाकरे येतील अशी माहिती दिली आहे.

मालेगाव, नाशिक : उध्दव ठाकरे यांच्या सभेला अवघे काही तास उरलेले असतांना मालेगावात काही घडामोडी घडताना दिसत आहे. उध्दव ठाकरे ज्या ‘ मोसमपुल ‘ मार्गाने शहरात दाखल होणार होते, त्या मार्गात सुरक्षिततेचे कारण देत पोलिसांकडून बदल करण्यात आला आहे. शहरातील टेहेरे चौफुली, सोयगाव, डी.के.चौक आदी मार्गाने उध्दव ठाकरे हे सभास्थळी दाखल होतील, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.मात्र अद्याप अधिकृत असा दुजोरा याबद्दल पोलिसांकडून देण्यात आलेला नाही. मात्र खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीत ठाकरे हे याच ‘ मोसमपुल ‘ मार्गाने शहरात दाखल होतील यावर ठाम आहेत. या मोसमपुल मार्गावरच मंत्री दादा भुसे यांचे कार्यालय असून राऊत यांच्याविरोधात याच ठिकाणी आंदोलन करत पुतळा जाळण्यात आला होता.

Published on: Mar 26, 2023 03:13 PM