राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी घेतली अजित पवार यांची भेट, राजकीय चर्चांना उधाण!
राज्य पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस हा चांगलाच चर्चेत आला. राज्यातील शेतकऱ्यांचा विषय अधिवेशनात गाजला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उचांवल्या.
मुंबई, 20 जुलै 2023 | राज्य पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस हा चांगलाच चर्चेत आला. राज्यातील शेतकऱ्यांचा विषय अधिवेशनात गाजला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उचांवल्या. उद्धव ठाकरे यांनी विधानभवनातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अन्य ठाकरे गटाचे नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना फुलगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. तर अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना स्वत: बसायला खुर्ची दिली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली.
Published on: Jul 20, 2023 07:45 AM
Latest Videos