राजकारणाचे धंदे बंद करा, राऊतांचा योगींना इशारा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी त्यांच्या भेट घेतल्याने आता वेगळ्याच चर्चांना उधान आलं आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली आहे.
राऊत यांनी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना, रोड शो करण्याची काय गरज आहे असा सवाल केला आहे. यावेळी त्यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे वळवत त्यांच्यावर देखिल टीका केली आहे.
राऊत यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना, ते आता दावोसला जाणार आहेत. तिथे गुंतवणुकदारांची परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेल समोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा, असेही राऊत म्हणाले.