राऊत यांचा राज ठाकरेंवर हल्ला, म्हणाले, “…तर कान नाक टोचायचं काम सुरू करा”
राऊत यांनी, राज्यात आज महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. यावर कोणी बोलत नाही. फक्त उद्धव ठाकरेंवर तोफ डागली जाते. 18 वर्षांत राज ठाकरे यांचा पक्ष कुठं आहे, हे बघावं. रोज उठून उद्धव ठाकरेंवर काय बोलता?” असा ही सवाल केला आहे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कवर बुधवारी गुढीपाडवा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागत उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेनेवर ही परिस्थिती आल्याचे म्हटलं होतं. त्या टीकेला उत्तर खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. तसेच सर्वात आधी राज ठाकरे यांनी स्वत:च्या पक्षाकडे बघावं असं म्हटलं आहे.
यावेळी राऊत यांनी, राज्यात आज महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून वर आले आहेत. यावर कोणी बोलत नाही. फक्त उद्धव ठाकरेंवर तोफ डागली जाते. 18 वर्षांत राज ठाकरे यांचा पक्ष कुठं आहे, हे बघावं. रोज उठून उद्धव ठाकरेंवर काय बोलता?” असा ही सवाल केला आहे. कोणाला धनुष्यबाण मिळालं, कोणाला नाव मिळालं, म्हणून त्यांचा पक्ष होत नाही. आम्ही आमचं काम करतोय. पण तुम्हाला काही कामं नसतील तर कान नाक टोचायचं काम सुरू करा”, असा टोलाही त्यांनी लगावला.