‘शिवसेना फोडणे हे मैत्रीचं लक्षण आहे का?’ उद्धव ठाकरे यांचा शाहांना सवाल?
यावेळी त्यांनी यवतमाळमध्ये पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फैलावर घेत समाचार घेतला.
नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी यवतमाळमध्ये पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेवरून भाजपला चांगलेच फैलावर घेत समाचार घेतला. त्यानंतर त्यांनी 2019 ला घडलेल्या भाजप शिवसेना युती तुटल्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला. तसेच शाह यांच्यावर टीका करताना, पोहरादेवीची व आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो, अमित शाह यांनी 2019 ला दिलेला शब्द मोडला. त्यांनी 2019 ला अडीच वर्षे सेनेचा व अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री असा शब्द दिला होता. पण तो पाळला नाही. युतीत जे ठरले, ते त्यांनी नाकारलं, मला युतीतून बाहेर काढलं आणि आता शिवसेना अशा पद्धतीने फोडत आहेत. हे मैत्रीचं लक्षण आहे का? असा सवाल केला आहे.