आता विरोधात बोलूच दिलं जात नाही,उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

“आता विरोधात बोलूच दिलं जात नाही”,उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

| Updated on: Jul 07, 2023 | 12:14 PM

एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की,आज दुर्दैवाने सांगू शकतो ज्या विचारसरणीचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. ते आज देशाचं नेतृत्व करत आहे, ती विचारणी आज देशाला कवेत घेऊ इच्छीत आहे.

मुंबई : एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की,”आज दुर्दैवाने सांगू शकतो ज्या विचारसरणीचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता. ते आज देशाचं नेतृत्व करत आहे, ती विचारणी आज देशाला कवेत घेऊ इच्छीत आहे. अनेक जण सांगतात आणिबाणीच्या काळात झालेल्या अत्याचाराला कुणी समर्थन देणार नाही. मात्र, आणीबाणीनंतर ज्यांनी ती लादली त्यांनी आपल्याविरोधात प्रचार करायला वाव दिला होता. पण शिवसेनेनं एकट्याने पाठिंबा दिला होता.देशासाठी लोक मैदानात उतरले ही वेगळी लोकशाही म्हटली पाहिजे. आता तर बोलायचंच नाही, बोललं तर तोंड गप्प करून टाकायचं.”

Published on: Jul 07, 2023 12:14 PM