Special Report | शिवसेना नाव उद्धव ठाकरे यांना, तर धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना? ठाकरेंच्या बोलण्याचा अर्थ काय?

Special Report | शिवसेना नाव उद्धव ठाकरे यांना, तर धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना? ठाकरेंच्या बोलण्याचा अर्थ काय?

| Updated on: Jul 13, 2023 | 11:23 AM

विदर्भ दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी चिन्हाचा वाटप करण्याचा अधिकार निवडणुक आयोगाला आहे, पण शिवसेना हे नाव देता येणार नाही असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या आ विधानंतर नव्या चर्चेला उधाण आलं आहे.

मुंबई: शिवसेना आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विदर्भ दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी चिन्हाचा वाटप करण्याचा अधिकार निवडणुक आयोगाला आहे, पण शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी ठेवलं आहे, त्यामुळे निवडणूक आयोगला ते देता येणार नाही असं म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या आ विधानंतर नव्या चर्चेला उधाण आलं आहे.उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याचा अर्थ म्हणजे शिवसेना नाव ठाकरे गटालाच मिळावं आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना दिली तरी हरकत नाही का? असं आहे का? एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई निवडणूक आयोगाच्या दरबारी सुरु आहे. त्यामुळे शिवसेना नाव आणि चिन्हाचा नवीन निर्णय सुप्रीम कोर्टच घेईल. मात्र उद्धव ठाकरे यांना नेमकं काय बोलयाचं होतं यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jul 13, 2023 11:23 AM