तर विधानसभा आणि लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 07, 2024 | 4:24 PM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटाचा संभाजीनगरमध्ये जाहीर मेळावा पार पडला. यावेळी ते आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत होते. बघा नेमकं काय म्हणाले...?

Follow us on

आरक्षणाची टक्केवारी वाढवायला अधिवेशनात ठराव आणा, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. तर टक्केवारी वाढवण्याच्या ठरावाला विधानसभा आणि लोकसबेत पाठिंबा देऊ, असं आश्वसान देत आरक्षणाबाबत सरकारनं सर्वमान्य तोडगा काढावा अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. तर सर्व समाजातील जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जा.. आणि तुम्हाला काय हवं ते मांडा आणि टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर ती वाढवा, जर सर्वमान्य तोडगा काढल्यास माझा विधानसभा आणि लोकसभेत पाठिंबा असेल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटाचा संभाजीनगरमध्ये जाहीर मेळावा पार पडला. यावेळी ते आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलत होते.